Thursday, 14 May 2020

लेखांक-6

लेखांक-6⃣

💢 इयत्ता 10 वी
*विज्ञान भाग 2 : स्वअभ्यास*

प्रकरण 1 : *आनुवंशिकता व उत्क्रांती*
★★★★★★★★★

कालची चर्चा चांगलीच रंगली असणार? खूप प्रश्न अनुत्तरित सुद्धा राहिले असतील. हरकत नाही. आज आपण त्यानुषंगाने आणखी माहिती घेऊ. 

पृथ्वी किंवा या समस्त विश्वाची उत्पत्ती कशी झाली असावी हे जाणून घेण्याची जिज्ञासा मानवाला प्राचीन काळापासून आहे. त्यातूनच अनेक विचारवंत आणि दार्शनिकांनी आपल्या परीने याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या सुव्यवस्थित मांडणी केलेल्या मताला 'सिद्धांत' असे म्हणतात. 

🔹 पृथ्वी किंवा विश्वाच्या उत्पत्ती बाबत प्राचीन काळापासून साधारण खालील प्रमाणे सिद्धांत मांडले गेले आहेत. 

◆ पृथ्वी सपाट आहे.
◆ पृथ्वी विश्वाचा मध्य आहे.
◆ सूर्य विश्वाचा मध्य आहे.
◆ आकाशगंगा विश्वाचा मध्य आहे.
◆ *बिग बँग अर्थात महाविस्फोट सिद्धांत*
यातील बिग बँग सिद्धांत शास्त्रीय व सर्वमान्य आहे. 

🔹 त्याचप्रमाणे या पृथ्वीवर सजीवांची उत्पत्ती किंवा सृष्टीची निर्मिती कशी झाली याबाबत सुद्धा विविध सिद्धांत मांडले गेले आहेत. 

◆ जगातील सर्वात प्राचीन हिंदू धर्मातील वेद व उपनिषदात सृष्टीची उत्पत्ती ब्रम्हापासून झाली आहे असे सांगितले आहे. 

◆ ख्रिश्चन व मुस्लिम धर्माच्या मूळ यहुदी धर्म ग्रंथानुसार *अदम आणि इव्ह* सर्वप्रथम स्वर्गातून पृथ्वीवर आले असे सांगितले आहे. म्हणजे सृष्टी सुरवातीपासून अस्तित्वात होती मानव नंतर आला असे हे मत आहे. 

डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी लिखित *'पृथ्वीवर माणूस उपराच'* या पुस्तकात देखील साधारण असेच मत मांडले आहे. (शालेय ग्रंथालयातील हे पुस्तक मिळवून वाचा.) 

◆ सृष्टीच्या निर्मितीबद्दल यासारखीअनेक मिथके व उपपत्ती ग्रीक, रोमन, चिनी संस्कृतीमध्ये आढळतात. 

मात्र वैज्ञानिक दृष्टया अभ्यास केलेला आणि सर्वमान्य सिद्धांत म्हणजे *'सजीवांची उत्क्रांती' किंवा 'सजीवांचा क्रमविकास'* हा होय. आपण पाठयपुस्तकात याच वैज्ञानिक  सिद्धांताचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. 

-----------------------------
आजचे स्वअभ्यासचे प्रश्न*

(पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्र. 3 वरील मजकूर समजपूर्वक वाचा आणि खालील प्रश्नाची उत्तरे लिहा.) 

1) उत्क्रांती म्हणजे काय? विविध व्याख्या लिहा. 
2) प्राचीन पेशी कसा तयार झाला असावा?
3) उत्क्रांतीचा सिद्धांत थोडक्यात लिहा. 

...✍
*श्रीशैल मठपती, कोल्हापूर*
💢Ⓜ💢Ⓜ💢Ⓜ

No comments:

Post a Comment

लेखांक-32

लेखांक-3⃣2⃣ 💢 *स्वअभ्यास* इ.10 वी-विज्ञान भाग 2 प्रकरण 2: *सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-1* ================ *आजचा स्वाध्याय* पाठ्यपुस्तकातील...