Thursday, 14 May 2020

लेखांक-15

लेखांक-1⃣5⃣

💢 *स्वअभ्यास*
इ. 10 वी-विज्ञान भाग 2

प्रकरण 2: *सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-1*
★★★★★★★★★

🔹 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा: (Retrieval Practices)

1) तुम्हाला माहीत असणाऱ्या सजीवांतील जीवनप्रक्रियांची नावे लिहा.
 1) Write the names of life processes in living things that you know.

2) मानवी शरीरातील विविध जीवनप्रक्रिया पार पाडण्यासाठी कोणकोणत्या संस्था कार्यरत आहेत?
 2) What organizations are working to carry out various life processes in the human body?

*संदर्भ:* वरील प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी तुम्ही इ. 9 वी च्या विज्ञान पुस्तकातील प्रकरण क्र. 15 ची मदत घेऊ शकता. 
■■■

*पूर्वज्ञान जागृती*

तुम्ही एखाद्या (साखर) कारखान्याला भेट दिलाय का? तिथे कच्चा माल म्हणून कशाचा वापर करतात? 
जर साखर कारखाना असेल तर तिथे ऊस कच्चा माल म्हणून वापरतात. उसाच्या रसावर विविध रासायनिक प्रक्रिया करून त्यापासून साखर, इथेनॉल सारखे इंधन इ. निर्मिती केली जाते. त्याचबरोबर मळी सारखे नको असणारे टाकाऊ पदार्थ सुद्धा निर्माण होतात. उत्पादनाचे पॅकिंग, साठवण, वहन अशा प्रक्रिया सुद्धा पार पाडाव्या लागतात. 

याचप्रमाणे सजीवांचे शरीर सुद्धा एक कारखाना आहे. सजीवांसाठी अन्न हे कच्चा माल आहे. त्यावर विविध रासायनिक प्रक्रिया करून सजीव शर्करा व ऊर्जा निर्मिती करतात. या सर्व प्रक्रियेत टाकाऊ पदार्थ सुद्धा निर्माण होतात. उत्पादितांचे पॅकेजिंग, साठवण, वहन या क्रिया सुद्धा शरीरांतर्गत चालतात. सजीवांच्या शरीरात चालणाऱ्या अशा विविध प्रक्रियांना *"जीवन प्रक्रिया"* असे म्हणतात. परंतु सजीवांच्या शरीरात चालणाऱ्या जीवन प्रक्रिया वेगळ्या नावाने ओळखल्या जातात. वर स्वाध्यायात याच जीवन प्रक्रियांची नावे विचारली आहेत. शोधून किंवा आठवून लिहिण्याचा प्रयत्न करा.
■■■

...✍
*श्रीशैल मठपती,* कोल्हापूर

💢Ⓜ💢Ⓜ💢Ⓜ

No comments:

Post a Comment

लेखांक-32

लेखांक-3⃣2⃣ 💢 *स्वअभ्यास* इ.10 वी-विज्ञान भाग 2 प्रकरण 2: *सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-1* ================ *आजचा स्वाध्याय* पाठ्यपुस्तकातील...