Thursday, 14 May 2020

लेखांक-19

लेखांक-1⃣9⃣

💢 *स्वअभ्यास*
इ.10 वी-विज्ञान भाग 2

प्रकरण 2: *सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-1*
★★★★★★★★★

*आजचा स्वाध्याय*

1) खालील सहविकरांचे दीर्घ रूप लिहून त्यांच्यापासून किती ATP ऊर्जा मिळते ते लिहा.
a) NAD+ =
b) FAD+ =
-----------------------------

*ग्लुकोजचे विघटन*
(ग्लायकीलायसिस)

सजीवांच्या शरीरातील पेशींना जिवंत राहण्यासाठी ऊर्जेची अत्यन्त गरज असते. मेंदू आणि शरीरातील काही पेशीमध्ये ग्लुकोज किंवा ATP ची साठवण क्षमता तुलनेने खूप कमी असते. अशा पेशींना रक्तामार्फत सातत्याने ग्लुकोजचा पुरवठा करावा लागतो. पेशींना गरजेनुसार ग्लुकोजचा पुरवठा झाला की, पेशीत ऊर्जा निर्मितीची अखंड साखळी प्रक्रिया चालू होते. ऑक्सिश्वसनामध्ये तीन टप्प्यात ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण होते हे आपण काल पाहिले. त्यातील पहिला टप्पा आहे 'ग्लुकोज-विघटन'. 

◆ ग्लुकोज-विघटन ही ग्लुकोजच्या रेणूचे छोट्या रेणूत विघटन (तुकडे) होण्याची प्रक्रिया आहे.

◆ ही प्रक्रिया पेशींमधील जीवद्रवात (पेशींद्रवात) पार पडते. 

◆ ऑक्सिडीकरणामुळे 6 कार्बनी ग्लुकोजच्या रेणूंचे विघटन होऊन 3 कार्बनी पायरूवेटचे दोन रेणू तयार होतात. 

◆ ग्लुकोज रेणूमधील सहसंयुज बंध क्षीण करून त्याचे विघटन करण्यासाठी ऊर्जेची गरज लागते. त्यासाठी प्रारंभी पेशीतील 2 ATP रेणूंचा वापर करून अभिक्रिया गतिमान केली जाते. 

◆ ग्लुकोज विघटनात याशिवाय 10 विकरे सहभागी होतात आणि क्रमवार 10 पायऱ्यांमध्ये ग्लुकोजचे पायरूवेट मध्ये विघटन होते. पायरूवेट हे ग्लुकोज-विघटनाचे अंतिम उत्पादन आहे.

◆ त्याचबरोबर या संपूर्ण प्रक्रियेत NADH, ATPआणि पाण्याचे प्रत्येकी 2 रेणू तयार होतात. 

◆ ग्लुकोज विघटनाची प्रक्रिया ऑक्सिजनच्या मदतीने आणि ऑक्सिजन शिवाय सुद्धा होऊ शकते. जर ऑक्सिश्वसनाने ग्लुकोजचे विघटन झाले तर त्यात एकूण 8 ATP रेणू तयार होतात. (कारण एका NADH पासून 3 ATP तयार होतात.) सुरवातीचे 2 ATP खर्च धरले तर या प्रक्रियेत एकूण 8 ATP चा एकूण नफा होतो. 

◆ ग्लायकोलायसिस या प्रक्रियेचा शोध गुस्ताव्ह एम्बडेन, ओट्टो मेयरहॉफ आणि जेकब पार्णास यांनी लावला. म्हणून या प्रक्रियेला EMP पाथ-वे असेही म्हणतात. 

◆ ग्लुकोज-विघटनाची ही अभिक्रिया खालील प्रमाणे मांडता येईल.
C6H12O6 + 2 NAD+ + 2 ADP + 2 P -----> 2 pyruvic acid, [CH3(C=O)COOH] + 2 ATP + 2 NADH + 2 H++2H2O

पायरूवेट म्हणजेच पायरुविक आम्लाचे पुढे काय होते हे आपण उद्याच्या लेखात जाणून घेऊया..
 ■■■
-----------------------------
*माहीत आहे का तुला*

■ 'ग्लायकोलिसिस' या पहिल्या टप्प्यात तयार झालेले 'पायरूवेट' हे एक महत्वाचे (key product) उत्पादन आहे. प्रथिने व मेदापासून ऊर्जा निर्मिती करताना सुद्धा त्यांचे प्रथम पायरूवेट मध्येच रूपांतर होते. 

■ जर पेशीला ऑक्सिश्वसनाने ऊर्जा निर्मिती करावयाचे असेल तर पायरुवेट चे 'असेटील-को-एन्झाईम A' (असेटील-को-A) मध्ये रूपांतर होते.

■ जर पेशीला विनिक्सिश्वसनाने ऊर्जा निर्मिती करावयाचे असेल तर पायरुवेटचे किण्वन क्रियेने लॅक्टिक आम्लात किंवा अल्कोहोल रूपांतर होते. 

■ जर पेशीला ऊर्जा निर्माण करायचे नसेल तर ग्लुकोजचे रूपांतर ग्लायकोजन मध्ये होते. जेव्हा गरज असेल तेव्हा ग्लायकोजनचे पुन्हा ग्लुकोजमध्ये रूपांतर करुन ऊर्जा निर्मिती केली जाते. 
■■■
...✍
*श्रीशैल मठपती,* कोल्हापूर
💢Ⓜ💢Ⓜ💢Ⓜ

No comments:

Post a Comment

लेखांक-32

लेखांक-3⃣2⃣ 💢 *स्वअभ्यास* इ.10 वी-विज्ञान भाग 2 प्रकरण 2: *सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-1* ================ *आजचा स्वाध्याय* पाठ्यपुस्तकातील...