Thursday, 14 May 2020

लेखांक-22

लेखांक-2⃣2⃣

💢 *स्वअभ्यास*
इ.10 वी-विज्ञान भाग 2

प्रकरण 2: *सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-1*
★★★★★★★★★

*आजचा स्वाध्याय*: 
ग्लुकोज विघटन (ग्लायकोलिसिस) आणि सायट्रिक आम्ल चक्र यातील फरक खालील मुद्द्यांना अनुसरून लिहा. 
1. भावार्थ-
2. टप्पा क्रमांक-
3. स्थान-
4. अन्य नाव-
5. उत्पादने-
6. महत्व-
★★★★★★★★★★★

*श्रीकृष्ण*: हे पार्थ, गेले दोन दिवस तू सायलेंट मोडवर गेला आहेस, समस्या काय आहे?
*अर्जुन:* हे केशव, तू जे वर्णन केलंस ते मी लक्षपूर्वक ऐकत होतो. परंतु त्यातील बरीच माहिती माझ्या डोक्यावरून गेली. 
*श्रीकृष्ण:* तू म्हणतोस ते खरं आहे. हा तुझा प्रामाणिकपणा मला भावतो. पाठयपुस्तकाच्या मर्यादेत राहून कमीत-कमी शब्दात तुला ऊर्जा निर्मितीचे रहस्य समजावून सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. भविष्यात ही माहिती तुला उपयुक्त ठरणार आहे. माझ्या दृष्टीने संकल्पना समजणे महत्वाचे आहे. संकल्पना समजल्याशिवाय निव्वळ पाठांतर म्हणजे मूर्खपणा आहे.
*अर्जुन:* हे दयानिधी, तुझी तळमळ मला जाणवते. परंतु पाठयपुस्तकात एवढ्या किचकट आणि अनाकलनीय प्रक्रियेचे प्रयोजन काय?
*श्रीकृष्ण:* हे पार्थ, आपलं शरीर म्हणजे एक कारखाना आहे हे मी तुला सुरवातीलाच सांगितलं आहे. या कारखान्यातील सर्वात छोटं युनिट म्हणजे पेशी. प्रत्येक पेशीत काही शेकडा ते हजारात तंतुकणिका असतात. अशा प्रत्येक तंतुकणिकेत टर्बाईन सारखे फिरणारे यंत्र (क्रेब्ज चक्र)असतात. प्रत्येक श्वासागणिक आपण शरीरातील हे अब्जावधी टर्बाईन्स फिरवत असतो. हे टर्बाईन अव्याहतपणे पोषद्रव्यांचे उर्जासमृद्ध ATP मध्ये रूपांतर करून शरीरातील उर्वरित यंत्रणा कार्यरत ठेवण्यासाठी आवश्यक ऊर्जा पुरवत असतात. ATP हेच आमच्या मर्त्य शरीराचे इंधन आहे. ATP शिवाय आपण खावू शकत नाही, पिऊ शकत नाही आणि श्वाससुद्धा घेऊ शकत नाही. ATP शिवाय आपल्या शरीरातील कोणतीही यंत्रणा काम करू शकत नाही. ती हळूहळू मंदावत जाते आणि अखेर कायमची बंद पडते. 

पार्थ, मानवी शरीर एक अद्भुत यंत्र आहे. या शरीराची रहस्ये जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञ अहोरात्र मेहनत करत आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नामुळे आजचे मानवी जीवन अधिक समृद्ध झाले आहे. शास्त्रज्ञांच्या या शोधांचा प्रवास सुद्धा मोठा खडतर आणि रंजक आहे. मात्र विस्तार भयास्तव मी ते सांगणे टाळणार आहे. शक्य झाल्यास ग्रंथालयातील पुस्तकातून किंवा आंतरजालवर या कथा मिळवून तू वाचण्याचा प्रयत्न कर. त्यानंतर कदाचित तू मला, "या घटकाचे प्रयोजन काय?" असा प्रश्न विचारणार नाहीस.
*अर्जुन:* क्षमा वासुदेव!
■■■
...✍
*श्रीशैल मठपती,* कोल्हापूर

💢Ⓜ💢Ⓜ💢Ⓜ

No comments:

Post a Comment

लेखांक-32

लेखांक-3⃣2⃣ 💢 *स्वअभ्यास* इ.10 वी-विज्ञान भाग 2 प्रकरण 2: *सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-1* ================ *आजचा स्वाध्याय* पाठ्यपुस्तकातील...