Thursday, 14 May 2020

लेखांक-27

लेखांक-2⃣7⃣

💢 *स्वअभ्यास*
इ.10 वी-विज्ञान भाग 2
प्रकरण 2: *सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-1*
★★★★★★★★★

*आजचा स्वाध्याय*: 

पाठयपुस्तकातील पृष्ठ क्र. 18 व 19 वरील 'सूत्री विभाजन' हा घटक समजपूर्वक वाचा. 
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
पेशी विभाजनाची प्रक्रिया समजण्यासाठी काही मूलभूत संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे आहे. म्हणून गेले दोन दिवस त्याविषयी विस्ताराने लिहीत आहे. 

*गुणसूत्रे

🔹 *DNA आणि गुणसूत्र यातील फरक*

प्रत्येक पेशीत केंद्रक हे प्रधान अंगक असते. केंद्रकात केंद्रकआम्ल असते. हे केंद्रकआम्ल म्हणजे DNA (डिओक्सिरायबोज न्यूक्लिक आम्ल) होय. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक यंत्राखाली पाहिल्यानंतर द्रवरूप भासणारे हे केंद्रकआम्ल म्हणजे DNA चे (रंगसूत्राचे) लांबच लांब धागे आहेत हे स्पष्ट होते. 

पेशीविभाजन प्रक्रिया सुरू झाल्यावर हे धागे स्प्रिंगसारखे गुंडाळायला सुरवात होतात आणि त्यापासून इंग्रजी एक्स (X) आकारासारखे गुणसूत्रांची जोडी तयार होतात. एक्स आकाराच्या मध्यबिंदूला "गुणसूत्र बिंदू" म्हणतात. या गुणसूत्र बिंदूला दोन 'गुणसूत्र' चिकटलेले असतात. 

🔹 *मानवामध्ये किती गुणसूत्र असतात?*
मानवामध्ये एका कायिक पेशीत एकूण 46 गुणसूत्रे, म्हणजेच गुणसूत्राच्या 23 जोड्या असतात. म्हणून कायिक पेशींना डिप्लोईड (2n) असे म्हणतात. मात्र एका जनन पेशीत फक्त 23 गुणसूत्रे असतात म्हणून त्यांना हेप्लॉईड (n) असे म्हणतात. 

◆ आपल्या शरीरात फक्त 46 गुणसूत्रे असतात असा एक गैरसमज आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीत 46 गुणसूत्रे असतात. म्हणजे आपल्या शरीरातील प्रत्येक कायिक पेशीत 46 गुणसूत्रे असतात. मग शरीरातील अब्जावधी कायिक पेशीत एकूण किती गुणसूत्रे असतील याचा तुम्हीच हिशोब करा. उत्तर- 'अगणित' येईल ना? मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक पेशीत त्याचप्रकारची गुणसूत्रे असतात. पेशींगणिक त्यांच्यात बदल होत नाही हे विशेष. फक्त उत्परिवर्तन झाले तरच जनुकांचा क्रम बदलतो. 

🔹 *पेशीविभाजना वेळी गुणसूत्राची संख्या किती असते?*
पेशी विभाजनात एका कायिक पेशीपासून तसाच डुप्लिकेट पेशी तयार करायचा असतो. त्यामुळे विभाजनापूर्वी पेशी तिच्या केंद्रकात असलेल्या 46 गुणसूत्राची संख्या दुप्पट (द्विगुणित) करते. म्हणजे 46 (2n) गुणसूत्रांचे 92 (4n) गुणसूत्रे तयार होतात. [इथे n म्हणजे 23गुणसूत्रांचा एक संच] जनन पेशीत 23 (n) गुणसूत्रांचे 46 (2n) तयार होतात. 

🔹 *DNA का गुंडाळला जातो?*

DNA चे लांबच लांब धागे केंद्रकात अत्यंत कमी जागेत सामावलेले असतात. पेशी विभाजना पूर्वी त्यांना आपली संख्या दुप्पट करायची असते आणि तेवढे सर्व DNA त्याच जागेत सामावले जावेत यासाठी DNA चा धागा गुंडाळून त्याचे कुंतल तयार होतोे. जेणेकरून कमी जागेत जास्त DNA मावतात. DNA ला गुंडाळण्यासाठी केंद्रकातील हिस्टोन हे प्रथिन मदत करते. कोणते जनुक प्रकट करावयाचे आणि कोणते झाकून ठेवायचे हे देखील यात ठरवले जाते. 

🔹 *एक पेशी त्याच्या जीवन काळात जास्ती जास्त किती वेळा विभाजित होते?*

प्रत्येक पेशींचा जीवनकाल वेगवेगळा आहे. विविध पेशी 4 दिवसापासून 8 वर्षापर्यंत जगतात. पेशीच्या जीवन काळात किमान 50 ते 70 वेळा पेशींचे विभाजन होते. जस जसे त्याचे विभाजन होते तसे त्याच्या गुणसूत्रातील एका भुजेची लांबी कमी कमी होत जाते. यावरून गुणसूत्रांचे 4 प्रकार पडतात. 1) मध्यकेंद्री 2) उपमध्यकेंद्री 3) अग्रकेंद्री आणि 4) अंत्यकेंद्री.
गुणसूत्राच्या या प्रकाराची सविस्तर माहिती इयत्ता 9 वी च्या पुस्तकात पान नं. 181 वर आहे. 
■■■
...✍
*श्रीशैल मठपती,* कोल्हापूर
(9922242470)
💢Ⓜ💢Ⓜ💢Ⓜ

No comments:

Post a Comment

लेखांक-32

लेखांक-3⃣2⃣ 💢 *स्वअभ्यास* इ.10 वी-विज्ञान भाग 2 प्रकरण 2: *सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-1* ================ *आजचा स्वाध्याय* पाठ्यपुस्तकातील...