Thursday, 14 May 2020

लेखांक-21

लेखांक-2⃣1⃣

💢 *स्वअभ्यास*
इ.10 वी-विज्ञान भाग 2

प्रकरण 2: *सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-1*
★★★★★★★★★

*आजचा स्वाध्याय*: 
खालील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा.
1) ATP ला ऊर्जेचे चलन असे का म्हणतात?

★★★★★★★★★

*इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया*
(Electron Transfer Chain reaction : ETC reaction)

1] बहुसंख्य ऑक्सिजीव पेशी स्तरीय श्वसनात पोषकद्रव्यां पासून ऊर्जा निर्मिती करतात. या प्रक्रियेचा 'इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया' हा तिसरा आणि शेवटचा टप्पा आहे.

2] ETC अभिक्रिया पेशीतील तंतुकणिकेत आतील अस्तर क्रिस्टे (Cristae) मध्ये पार पडते.

3] दुसऱ्या टप्प्यातील सायट्रिक आम्ल चक्रातून प्राप्त झालेल्या NADH2 आणि FADH2 या सहविकारांच्या मदतीने तिसऱ्या टप्प्यातील ETC अभिक्रिया गतिमान होते. 

4] ETC अभिक्रियेत NADH2 आणि FADH2 ही सहविकरे इलेक्ट्रॉन देतात आणि ऑक्सिजन कडून इलेक्ट्रॉन स्वीकारले जातात. इलेक्ट्रॉन देवाण-घेवाणीची ही प्रक्रिया एकाचवेळी चालते म्हणून या अभिक्रियेला "रेडॉक्स अभिक्रिया" म्हणतात. सलग चालणाऱ्या रेडॉक्स अभिक्रियेच्या या मालिकेत ADP रेणूला तिसरा फॉस्फेट गट जोडून त्याचे ATP मध्ये रूपांतर केले जाते. 

5] NADH2 पासून 3 ATP तर FADH2 पासून 2 ATP रेणू तयार होतात. 

6] NADH2 आणि FADH2 कडून इलेक्ट्रॉन स्विकारल्यानंतर NAD आणि FAD ही मूळ सहविकरे पुन्हा TCA चक्र/ क्रेब्ज चक्रात परत पाठवली जातात.

7] पोषकद्रव्यांपासून ऊर्जा निर्मिती करण्याच्या एकूण प्रक्रियेत ETC भिक्रियेला अनन्यसाधारण महत्व आहे. कारण या टप्प्यात सर्वाधिक ATP रेणू तयार होतात. निर्माण होणाऱ्या एकूण 38 ATP पैकी 34 ATP तिसऱ्या टप्प्यात, 2 ATP दुसऱ्या टप्प्यात आणि 2 ATP पहिल्या टप्प्यात तयार होतात. यावरून ETC अभिक्रियेचे महत्व लक्षात येते.

8] श्वसन क्रियेत स्वीकारलेल्या ऑक्सिजनचा सर्वाधिक उपयोग ETC अभिक्रियेत होतो. 

9] पेशिस्तरीय श्वसन अभिक्रिया समीकरण खालील प्रमाणे दाखवतात.
C6H12O6 + 6O2 -----> 6CO2 + 6H2O + 38 ATP
■■■

*हे माहीत आहे का?*

◆ ATP मधले T म्हणजे ट्राय = तीन; म्हणजे त्यात तीन फॉस्फेट रेणू असतात. त्यातील एक फॉस्फेट रेणू ब्रेक झाला की ATP तून ऊर्जा मुक्त होते आणि त्याचे ADP त रूपांतर होते. इथे D म्हणजे डाय म्हणजे दोन फॉस्फेट रेणू. 

◆ हा ADP रेणू ETC अभिक्रियेत पुन्हा एक फॉस्फेट आयन प्राप्त करून उर्जाभारीत ATP होतो.
■■■
...✍
*श्रीशैल मठपती*, कोल्हापूर
💢Ⓜ💢Ⓜ💢Ⓜ

No comments:

Post a Comment

लेखांक-32

लेखांक-3⃣2⃣ 💢 *स्वअभ्यास* इ.10 वी-विज्ञान भाग 2 प्रकरण 2: *सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-1* ================ *आजचा स्वाध्याय* पाठ्यपुस्तकातील...