Thursday, 14 May 2020

लेखांक-20

लेखांक-2⃣0⃣

💢 *स्वअभ्यास*
इ.10 वी-विज्ञान भाग 2
प्रकरण 2: *सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-1*
★★★★★★★★★★
....✍ 
श्रीशैल मठपती, कोल्हापूर
-------–---------–-----------
*आजचा स्वाध्याय*: 

1) या पोस्ट सोबत दिलेल्या छायाचित्रातील क्रेब्ज चक्राचे सुबक रेखाटन आपल्या वहीमध्ये करा. 
-----------------------------
*क्रेब्ज चक्र*

◆ क्रेब्ज चक्र हा पेशी श्वसनाच्या एकूण तीन टप्प्यातील दुसरा टप्पा आहे. हा टप्पा फक्त ऑक्सिश्वसन करणाऱ्या सजीवामध्येच आढळतो.

◆ क्रेब्ज चक्रातील सर्व अभिक्रिया तंतुकणिकेतील द्रवात (मेट्रिक्समध्ये) पार पडतात.

◆ ग्लायकोलिसिस प्रक्रियेत तयार झालेल्या पायरुवेटला क्रेब्ज चक्रात प्रवेश करण्यापूर्वी एका रासायनिक अभिक्रियेद्वारे  'असेटील को-एंझाईम A' मध्ये रूपांतरित व्हावे लागते. म्हणून पायरुवेटचे  असेटील को-A मध्ये रूपांतर करणाऱ्या या अभिक्रियेला ग्लायकोलिसिस व क्रेब्ज चक्र यांना जोडणारी (Link reaction) रासायनिक अभिक्रिया म्हणून ओळखले जाते. 

◆ क्रेब्ज चक्रात एकूण 8 पायऱ्यांमध्ये रासायनिक अभिक्रिया घडून येतात. त्यात 8 प्रकारची सहविकरे भाग घेतात.

◆ सर्वप्रथम तंतुकणिकेत  'असेटील को-ए' हे चार कार्बनी ऑक्सालो-असेंटिक आम्लाबरोबर संयोग पावून सहा कार्बनी सायट्रिक आम्लात रूपांतरित होते. 

◆ क्रेब्ज चक्र ही चक्रीय अभिक्रिया आहे. म्हणजे पाहिले व शेवटचे उत्पादन तेच असते. 

◆ क्रेब्ज चक्रात घडून येणाऱ्या 8 रासायनिक अभिक्रियेच्या मालिकेत सायट्रिक आम्ल हे पहिले व शेवटचे उत्पादन आहे. म्हणून क्रेब्ज चक्राला 'सायट्रिक आम्ल चक्र' या नावाने ओळखले जाते. 

◆ सायट्रिक आम्लात तीन कार्बोक्झिलीक गटाचा समावेश असतो म्हणून क्रेब्ज चक्राला 'ट्राय कार्बोक्झिलीक आम्ल चक्र' या नावानेही ओळखले जाते. 

◆ क्रेब्ज चक्राद्वारे  CO2, H2O, NADH, FADH2 आणि ATP चे रेणू मिळतात. 

◆ क्रेब्ज चक्रात मोठ्या प्रमाणात ATP तयार करण्याऐवजी 'असेंटील को-ए' मधील 8 इलेक्ट्रॉन काढून घेऊन ते सहविकर NAD+ आणि FAD कडे पोहोचवले जातात. त्यामुळे  क्षपण क्रिया होऊन NAD+ चे NADH आणि FAD चे FADH2 मध्ये रूपांतर होते. या सहविकरा मार्फत इलेक्ट्रॉन तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच ETC अभिक्रियेत पाठवले जातात. 

◆ या चक्रीय अभिक्रियांचा शोध सर हेन्झ क्रेब यांनी लावला म्हणून या अभिक्रियेला "क्रेब चक्र" असे संबोधले जाते. 

◆ क्रेब चक्र ऊर्जा निर्मितीसाठी उपयुक्त आहेच त्याचप्रमाणे ग्लुकोज, मेदाम्ले आणि अमिनो आम्लाच्या जैवसंश्लेषणात सुद्धा याचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

★ सजीवांच्या पेशीत ग्लुकोज, मेदाम्ले आणि अमिनो आम्ल तयार करण्याची क्षमता असते हे क्रेब चक्राच्या संशोधनामुळे सिद्ध झाले आहे. त्यामुळे एकपेशीय सजीवापासून जीवसृष्टी उत्क्रांत झाली या उत्क्रांतीच्या सिद्धांताला दुजोरा मिळाला आहे. 
■■■
...✍
*श्रीशैल मठपती,* कोल्हापूर
💢Ⓜ💢Ⓜ💢Ⓜ

No comments:

Post a Comment

लेखांक-32

लेखांक-3⃣2⃣ 💢 *स्वअभ्यास* इ.10 वी-विज्ञान भाग 2 प्रकरण 2: *सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-1* ================ *आजचा स्वाध्याय* पाठ्यपुस्तकातील...