लेखांक-1⃣6⃣
💢 *स्वअभ्यास*
इ.10 वी-विज्ञान भाग 2
प्रकरण 2: *सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-1*
★★★★★★★★★
*आजचा स्वाध्याय*
खालील प्रश्नाचे उत्तर लिहा:
1) मानवी पचनसंस्थेत सहभागी इंद्रियांची क्रमवार नावे लिहा.
2) प्रत्येक इंद्रियांचे कार्य जाणून घ्या.
मानवी पचनसंस्था समजून घेण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी मारा आणि व्हिडीओ पहा.
https://youtu.be/KiSZeOLM1fQ
----★★★-------★★---
जाणून घेऊ *शरीर रहस्य*
(महाभारत इफेक्ट)
*अर्जुन:* वासुदेव! आपण अन्न का खातो?
*श्रीकृष्ण:*हे पार्थ, अन्न ही शरीराची गरज आहे. भूक भागवण्यासाठी आपण अन्न खातो.
*अर्जुन:* अन्नातून आपल्याला काय मिळते?
*श्रीकृष्ण:* अन्नातून पोषद्रव्ये मिळतात. अन्नाची दोन मूलभूत कार्ये आहेत.
१) शरीराच्या योग्य वाढीसाठी विविध मूलद्रव्ये योग्य त्या स्वरूपात शरीराला पुरविणे –
२) शरीराला ऊर्जा पुरविणे –
*अर्जुन:* पोषद्रव्ये म्हणजे काय?
*श्रीकृष्ण:* सजीवाला जिवंत राहण्यासाठी आणि वाढ होण्यासाठी आवश्यक असणारे पोषक द्रव्य म्हणजे पोषद्रव्य होय.
*अर्जुन:* पोषद्रव्य एकच आहे की अनेक? अनेक असतील ते किती प्रकारचे आहेत?
*श्रीकृष्ण:* पोषद्रव्ये साधारण प्रमुख 7 प्रकारची आहेत. *जास्त प्रमाणात लागणारी -* कर्बोदके, प्रथिने आणि मेद; तर *अल्प प्रमाणात लागणारी -* जीवनसत्वे, क्षार, तंतुमय पदार्थ आणि पाणी अशी एकूण 7 प्रकारची पोषद्रव्ये सजीवाला आवश्यक असतात.
*अर्जुन:* ते सर्व एकाच प्रकारच्या अन्नातून मिळतात की प्रत्येक अन्न प्रकारात वेगवेगळी पोषद्रव्ये असतात?
*श्रीकृष्ण:* पार्थ,
*कर्बोदके-* ज्वारी, गहू. मका, तांदूळ यासारख्या एकदल तृणधान्यातून मिळतात.
*प्रथिने -* विविध डाळी मधून म्हणजेच द्विदल धान्यातून मिळतात.
*मेद-* दूध, दुग्धजन्य पदार्थ, तेल, अंडी, मांस अशा स्निग्ध पदार्थातून मिळतात.
*जीवनसत्वे-* हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, दूध, अंडी, इत्यादीतून मिळतात.
*खनिजे-* भाज्या, पाणी इ.
*तंतुमय पदार्थ-* पालेभाज्या, फळे इ. मधून मिळतात.
*अर्जुन:* एखादे पोषद्रव्य गरजेपेक्षा जास्त सेवन केल्यास त्याचा शरीराला फायदा होतो का?
*श्रीकृष्ण:* आहारात या पोषद्रव्याचे योग्य संतुलन साधने अत्यन्त महत्वाचे असते. एखादे पोषद्रव्य गरजेपेक्षा जास्त सेवन केल्यास त्याचा शरीराला अपाय होऊ शकतो. उदाहरणार्थ मेद आणि कर्बोदकांच्या अतिसेवनाने 'लठ्ठपणा, हृदयरोग' असे विकार जडतात. याऊलट एखादे पोषद्रव्य अजिबात सेवन केले नाही तर त्याच्या अभावामुळे सुद्धा रोग होऊ शकतो. उदाहरणार्थ अल्प प्रमाणात लागणाऱ्या 'अ' जीवनसत्वा अभावी 'रातांधळेपणा' हा रोग होऊ शकतो. त्यासाठी योग्य 'संतुलित आहाराचे' सेवन करणे हितकारक आहे.
*अर्जुन*: संतुलित आहार म्हणजे काय?
*श्रीकृष्ण*: ज्या आहारातून आपल्याला उत्तम आरोग्य राखण्यासाठी उर्जासमृद्ध पदार्थ जसे कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, शरीराच्या जडणघडणीसाठी आवश्यक पदार्थ जसे प्रथिने, क्षार आणि जीवनसत्वे शरीराला आवश्यक त्या प्रमाणात मिळतात तो आहार म्हणजे संतुलित आहार होय.
*अर्जुन:* संतुलित आहाराचे महत्व काय आहे?
*श्रीकृष्ण:* शरीराचे योग्य पोषण व्हावे, ते कार्यक्षम आणि निरोगी राहावे, यासाठी संतुलित आहार अत्यन्त महत्वाचे आहे.
*अर्जुन*: वासुदेव! बहुतेक पोषद्रव्ये वनस्पतीतून मिळतात. मग वनस्पतीत ती कुठून येतात?
*श्रीकृष्ण:* मातीतून. वनस्पती मातीत असणारी मूलद्रव्ये मुळाद्वारे शोषून घेऊन त्याचे पोषद्रव्यात रूपांतर करतात. वनस्पतिकडून ही पोषद्रव्ये प्राण्यांना संक्रमित होतात. प्राणी मृत पावला की, परत ही मूलद्रव्ये विघटन होऊन मातीत जातात. ही चक्रीय क्रिया आहे. मातीतून वनस्पतीत, वनस्पतीतून प्राण्यात आणि प्राण्यांकडून पुन्हा मातीत *हाच या सृष्टीचा नियम आहे.*
हे पार्थ, आता आपण इथेच थांबू. तुझ्या उर्वरित प्रश्नांची उत्तरे पुढील भागात देतो. उद्या भेटू. तोपर्यंत हा भाग पुन्हा-पुन्हा समजपूर्वक वाचून काढ.
धन्यवाद!
...✍
*श्रीशैल मठपती,* कोल्हापूर
💢Ⓜ💢Ⓜ💢Ⓜ
No comments:
Post a Comment