लेखांक-3⃣1⃣
💢 *स्वअभ्यास*
इ.10 वी-विज्ञान भाग 2
प्रकरण 2: *सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-1*
================
*आजचा स्वाध्याय*
खालील मुद्द्यांच्या आधारे
सूत्री आणि अर्धसूत्री विभाजनातील फरक लिहा.
# अर्थ
# प्रजननाचा प्रकार
# आढळ
# गरज
# अंतिम निर्मिती
# एकूण विभाजन संख्या
# जनक पेशी
# गुणसूत्र संख्या
# टप्पे
================
*शंका निरसन*
1) *अर्धसूत्री विभाजनाचे शरीरातील स्थान कोणते?*
उत्तर:
◆ अर्धसूत्री विभाजन सजीवाच्या लिंग पेशीत घडून येते. परंतु याचा अर्थ शुक्राणू आणि अंडाणू मध्ये पेशी विभाजन घडून येते असा चुकीचा अर्थ घेतला जातो. शुक्राणू आणि अंडाणू ही अर्धगुणसूत्रातून तयार झालेल्या जन्य पेशींची नावे आहेत.
◆ नराच्या वृषणातील जननद अधिस्तर (Germinal epithelium) पेशीमध्ये अर्धसूत्री विभाजन होऊन शुक्राणू तयार होतात.
◆ स्त्रियांमध्ये जन्मताच अंडाशयात अर्धसूत्री पेशी विभाजन होऊन साधारण 3 लाख अंडाणू तयार झालेले असतात. पौगंडावस्थेत दर महिन्याला एक याप्रमाणे ते उदरपोकळीत सोडले जातात.
◆ म्हणजे शुक्राणू आणि अंडपेशी ही दोन्ही अर्धसूत्री विभाजनाने तयार झालेली हेप्लॉईड युग्मके आहेत.
2) *मानवामधील अर्धसूत्री विभाजनाचा कालावधी कोणता असतो.?*
उत्तर:
◆ पुरुष यौवनावस्थेत पोहोचल्यानंतर शुक्राणू निर्मितीला प्रारंभ होते ती आयष्यभर चालू राहते. एका दिवसात निरोगी प्रौढ नर लक्षवधी शुक्राणू निर्माण करतो.
◆ स्त्रियांमध्ये पौगंडावस्थेत दर महिन्याला एक अंडाणू पक्व होऊन उदर पोकळीत सोडला जातो. ही अंडाणू निर्मिती क्रिया स्त्रीच्या वयाच्या 40 ते 45 वर्षापर्यंत चालते.
3) *समजात गुणसूत्रे (homologous chromosomes) म्हणजे काय?*
उत्तर:
◆ एक आईकडून आणि दुसरे वडीलाकडून आलेल्या डिप्लोईड गुणसूत्र जोडीला समजात गुणसूत्र म्हणतात.
◆ या दोन्ही गुणसूत्रांची उंची, जाडी, जनुक क्रम आणि गुणसूत्र बिंदूचे स्थान इ. बाबी एकसारखे असतात.
4) *गुणसूत्र भगिनी (sister chromatids) म्हणजे काय?*
उत्तर:
◆ पेशी विभाजनात समजात गुणसूत्रांच्या (डुप्लिकेट) प्रति तयार केल्या जातात.
◆ आईकडून आलेले n गुणसूत्र व त्याचा डुप्लिकेट मिळून 2n गुणसूत्र भगिनी तयार होतात. ते दोन्ही सर्व बाबतीत एकसारखे असतात म्हणून त्यांना गुणसूत्र भगिनी म्हणतात.
◆ असेच वडिलाकडून आलेल्या 'n' गुणसूत्रपासून '2n' गुणसूत्र भगिनी तयार केल्या जातात. (सोबत दिलेली आकृती पहा.)
उर्वरित प्रश्न उद्या पाहू.
■■■
...
★ *मागील सर्व लेख मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.*
https://shrishail-mathapati.blogspot.com/
No comments:
Post a Comment