लेखांक-3⃣0⃣
💢 *स्वअभ्यास*
इ.10 वी-विज्ञान भाग 2
प्रकरण 2: *सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-1*
================
*आजचा स्वाध्याय*
1) अर्धगुणसूत्री विभाजनाच्या पहिल्या पूर्वावस्थेतील पाच अवस्थांचे योग्य आकृत्यांच्या आधारे वर्णन लिहा.
2) सोबत दिलेल्या लिंकवर क्लीक करून गुणसूत्री विभाजनाचा व्हिडीओ पहा.
https://youtu.be/xsrH050wnIA
================
*अर्धगुणसूत्री विभाजन* Meiosis
[ *टीप*- यात पूर्वावस्था -1 हा भाग सर्वात महत्वाचा आहे. तो समजपूर्वक वाचा. बाकी सर्व माहिती साधारण सूत्री विभाजना सारखीच आहे. ]
■ या पेशीविभाजनाचे नाव 'अर्धगुणसूत्री' असे का ठेवले असेल?
# Meiosis मधील meion या ग्रीक शब्दाचा अर्थ lessening म्हणजे 'कमी होणे'असा आहे. या विभाजनात गुणसूत्रांची संख्या अर्धी (half) होते म्हणून मराठीत 'अर्धगुणसूत्री' हा शब्द वापरला आहे.
■ *अर्थ:*- अर्धसूत्री विभाजनात एका (2n) पेशीपासून 4 एकगुणी (n) युग्मकपेशी तयार होतात. या चारही जन्य पेशीत गुणसूत्रांची संख्या जनक पेशींच्या गुणसूत्रांच्या संख्येच्या अर्धी (n) असते.
■ *आढळ*:*-
# अर्धसूत्री विभाजन सजीवांच्या जनन/लिंग पेशीत घडून येते.
■ *उद्देश:*-
प्रजननासाठी शुक्राणू किंवा अंडाणू निर्माण करणे.
■ *विभाजन प्रक्रिया*
या प्रक्रियेत एका पेशीचे दोन वेळा विभाजन होते आणि चार जन्य पेशी तयार होतात. या दोन विभाजनांचा उल्लेख "अर्धसूत्री विभाजन-1" आणि "अर्धसूत्री विभाजन- 2" असा केला जातो.
--------------------------------
*अ) अर्धसूत्री विभाजन-1*
■ *पूर्वतयारी (इंटरफेज)*
अर्धसूत्री विभाजन 1 मध्ये साधारण सूत्री विभाजनातील G1, S आणि G2 अवस्थाप्रमाणे पूर्वतयारी केली जाते.
★IMP
■ P1 *पूर्वावस्था -1*
[याअंतर्गत पाच टप्पे येतात.]
i) *वलयीभवन:* Leptotene:
गुणसूत्रांचे वलयीभवन होते.
ii) *गुणसूत्र मिलन:* Zygotene:
समजात गुणसूत्रांची जोडणी 'X' आकारात होते. दोन जोड्या एकमेकाला चिकटून चतुष्क तयार होते.
iii) *आलिंगन:* Pachytene:
समजात गुणसूत्रांच्या चतुष्काचे घनिभवन होते आणि त्यातील गुणसूत्र भगिनी नसणाऱ्या भुजामध्ये 'पारगती' घडून येते.
iv) *विलगीकरण:* Diplotene:
चतुष्कातील चिकटलेल्या गुणसूत्र भुजा विलग होतात.
v) *द्विगुणन व ध्रुवीकरण:* Diakinesis:
एका ताराकेंद्राचे दोन ताराकेंद्र तयार होतात. ताराकेंद्र विरुद्ध दिशेला जातात. केंद्रक आवरण अदृश्य होते.
■ M1 *मध्यावस्था 1*
तुर्कतंतू चतुष्काच्या गुणसुत्रबिंदूला चिकटतात व प्रसरण पावत त्यांची विषुववृत्तावर सरळ रेषेत रचना करतात.
■ A1 *पश्चावस्था 1*
तुर्कतंतू आकुंचन पावू लागतात आणि चतुष्काचे विभाजन करून युगल गुणसूत्रांना ध्रुवाकडे खेचू लागतात.
■ T1 *अंत्यावस्था 1*
अवलयीभवन, केंद्रक निर्मिती आणि परीकल विभाजन होऊन दोन एकगुणी कन्या पेशी तयार होतात.
================
*ब) अर्धसूत्री विभाजन-2*
पहिल्या पेशीविभाजना नंतर इंटरफेज 2 द्वारे दुसऱ्या विभाजनाची तयारी केली जाते. ही प्रक्रिया अल्पकाळात पूर्ण होते.
त्यानंतर अर्धसूत्री विभाजन-२ ची प्रक्रिया सुरू होते आणि ती साधारण सूत्री विभाजनासारखी असते. यात भाग 1 मध्ये तयार झालेल्या दोन जन्य पेशी भाग घेतात.
■ P2 *पूर्वावस्था 2*
गुणसूत्रांचे घनिभवन, केंद्रकावरण विरघळणे, ताराकेंद्र द्विगुणित होणे या क्रिया होतात.
■ M2 *मध्यावस्था 2*
तारकेंद्राचे ध्रुवीकरण, तुर्कतंतू निर्मिती आणि गुणसूत्र पेशी मध्यावर रचले जातात.
■ A2 *पश्चावस्था 2*
तुर्कतंतू आक्रसतात, गुणसूत्र भगिनी विलग होतात व ध्रुवाकडे खेचले जातात.
■ T2 *अंत्यावस्था 2*
अवलयीभवन, केंद्रक निर्मिती आणि परीकल विभाजन होऊन चार एकगुणी युग्मक पेशी तयार होतात.
याप्रमाणे एक द्विगुणीत (2n) लिंग पेशीपासून चार एकगुणीत (n) युग्मक पेशी तयार होतात. या चारही जन्यपेशी पारगतीमुळे जनुकीयदृष्ट्या जनक पेशीपेक्षा आणि एकमेकांपेक्षा वेगवेगळ्या असतात.
*समजात गुणसूत्रे, पारगती, चतुष्क आदी शब्दांचा अर्थ आपण उद्या पाहूया*
■■■
★ *मागील सर्व लेख मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.*
https://shrishail-mathapati.blogspot.com/
💢Ⓜ💢Ⓜ💢Ⓜ
No comments:
Post a Comment