Tuesday, 19 May 2020

लेखांक-32

लेखांक-3⃣2⃣

💢 *स्वअभ्यास*
इ.10 वी-विज्ञान भाग 2
प्रकरण 2: *सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-1*
================
*आजचा स्वाध्याय*

पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्र. 20 वरील 'जरा डोके चालवा' या शीर्षकाखाली विचारलेल्या सहा प्रश्नाची उत्तरे लिहा.
=================

*शंका समाधान-2*

1] *चतुष्क म्हणजे काय? ते केंव्हा तयार होते?*

उत्तर:- 
◆ समजा, जनक (Parental cell) पेशीमध्ये 'अ'  गुणसूत्र आईकडून आणि 'ब' गुणसूत्र बाबाकडून आले आहे. 'अ' ची प्रत (xerox) तयार होऊन त्याचे "अ-1, आणि अ-2" तसेच 'ब' ची प्रत तयार होऊन "ब-1 आणि ब-2" अशी दोन भगिनी गुणसूत्रे (sister cromatids) तयार होतात. (अ1, अ2) आणि (ब1, ब2) ला समजात गुणसूत्रांची जोडी (homologous pair) असे संबोधतात. 

◆ अर्धगुणसूत्री विभाजन-1 मध्ये ही समजात गुणसूत्रांची जोडी एकमेकाला चिकटते. (गुणसूत्र बिंदूजवळ स्टेपल होते.) यातून "अ1+अ2+ब1+ब2" अशा चार गुणसूत्रांचा एक जुडगा (bunch) तयार होतो. त्याला चतुष्क असे म्हणतात. (सोबत दिलेली आकृती क्र. 1 पहा.) 

◆ गुणसूत्रांचे हे चतुष्क अर्धसूत्री विभाजनात पूर्वावस्था 1 मध्ये तयार होते. 

◆ समजात गुणसूत्रात पारगती होऊन गुणसूत्रांचे पुनःसंयोजन होण्यासाठी चतुष्क निर्मिती आवश्यक आहे.
=================
2] *चिऍस्मा (chiasma) म्हणजे काय?*
उत्तर-
◆ समजात गुणसूत्रांचे चतुष्क तयार होते. चतुष्कातील समजात गुणसूत्रे आलिंगन दिल्यासारखी परस्परांना घट्ट चिकटतात. त्यामुळे चतुष्काची जाडी वाढते व ती सूक्ष्मदर्शक यंत्रात स्पष्ट दिसू लागते. अशा इंगजी 'X' अक्षरासारख्या रचनेत ज्या बिंदूत गुणसूत्र चिकटतात त्या बिंदूला 'चिऍस्मा' म्हणतात आणि सहभागी गुणसूत्र भुजाना "चैऍस्मॅटा" किंवा "फुली" असे म्हणतात. फुलीच्या ठिकाणी जनुकांची अदला-बदल होते. (आकृती क्र. 2 पहा.) चैऍस्मॅटा मध्ये गुणसूत्रात पारगती झाल्यामुळे ती एकसमान (identical) रहात नाहीत. 
=================
3] *जनुकीय पारगती (crossing over) म्हणजे काय?*

उत्तर:
◆ चैऍस्मॅटा मध्ये परस्परांना चिकटलेल्या समजात गुणसूत्रात जनुकांची अदला-बदल होते. या प्रक्रियेला जनुकीय पारगती (crossing over) असे म्हणतात. (सोबत दिलेली आकृती क्र. 3 पहा.) 

◆ पारगती नंतर समजात गुणसूत्रामध्ये जनुकांची नवी रचना होते. त्यालाच "जनुकाचे पुनःसंयोजन" असे म्हणतात. 
==================
4] *जनुकीय पारगती/ जनुकीय पुनः संयोजनचे महत्व स्पष्ट करा.*

# गुणसूत्रात नवीन जुळणी झाल्यामुळे पुढच्या पिढीत विविधता निर्माण होते.

# नवे जनुकीय बदल उत्क्रांतीस कारणीभूत ठरतात.

# नवनवीन प्रजातींची निर्मिती करता येऊ शकते. (विशेषतः वनस्पतीमध्ये) 
================
*टीप*- पाठयपुस्तकात फारच त्रोटक माहिती दिली आहे. जिज्ञासू विद्यार्थ्यांसाठी आणि संकल्पना स्पष्ट व्हावी या उद्देशाने थोडी सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. 
■■■
...
★ *मागील सर्व लेख मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.*
https://shrishail-mathapati.blogspot.com/
💢Ⓜ💢Ⓜ💢Ⓜ

No comments:

Post a Comment