Saturday, 16 May 2020

लेखांक-29

लेखांक-2⃣9⃣

💢 *स्वअभ्यास*
इ.10 वी-विज्ञान भाग 2
प्रकरण 2: *सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-1*
================
*आजचा स्वाध्याय*

1) आकृतीच्या मदतीने सूत्री विभाजनाचे सविस्तर वर्णन करा.

2) सूत्री विभाजनाचा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.
https://youtu.be/c5hA0WCv1lg
================
*सूत्री विभाजन* Mitosis

पुढे चालू...
3) *पश्चावस्था* Anaphase
गुणसूत्रबिंदूला तुर्कतंतू जोडलेले असतात. हे तुर्कतंतू आक्रसू लागतात. त्यांच्या सहाय्याने सिस्टर क्रोमॅटिडना (मूळ+प्रत= गुणसूत्र भगिनी) विरुद्ध दिशेला खेचले जाते. त्यामुळे ध्रुवाकडे पेशींचा आकार किंचित वाढतो. 

4) *अंत्यावस्था:* Telophase
◆ *गुणसूत्रांचे एकत्रीकरण*:- पेशीच्या दोन्ही ध्रुवाजवळ पोहोचलेली गुणसूत्रे एकत्र जमतात.
◆ *केंद्रकावरण निर्मिती:*- गुणसूत्रांच्या दोन्ही संचाभोवती केंद्रकावरण तयार होते. त्यामुळे एका पेशीत दोन जन्य केंद्रके (daughter nuclei) तयार होतात. 
◆ *अवलयीभवन:*- गुणसूत्रांची वलये उलगडतात व त्यांचे रूपांतर पुन्हा DNA धाग्यात होते.
◆ *तुर्कतंतू नाहीसे होतात* आणि दोन्ही केंद्रकात केंद्रकी दिसू लागतात. 
-------------------------------
ब] *परीकल विभाजन*
◆ *प्रारंभ:*- अंत्यवस्थेनंतर पेशींद्रव्याच्या विभाजनाला सुरवात होते.
◆ *आकुंचन:*- पेशीच्या मध्यभागातील पेशीपटल आकुंचन पावू लागते.
◆ *खाच निर्मिती:*- पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला एक समांतर खाच तयार होऊन ती हळूहळू खोलवर जाते.
◆ *पूर्णत्व:*- खाच पूर्णत्वाला जाऊन दोन नव्या जन्य पेशी तयार होतात. 
◆ *अपवाद:*- वनस्पती पेशीमध्ये खाच ऐवजी एक परिपटल तयार होऊन परीकल विभाजन होते. 
-------------------------------
■ *सूत्री विभाजनाचे फायदे*

सूत्री विभाजन खालील गोष्टीसाठी आवश्यक आहे.
◆ *वाढ*- शरीराच्या वाढीसाठी 
◆ *झीज* पेशी जीर्ण होण्याने शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी
◆ *जखमा* भरून काढण्यासाठी
◆ *रक्तपेशी* निर्मितीसाठी

================
■ परीक्षेच्या दृष्टीने सूत्री विभाजनातील चार अवस्था क्रमवार कसे लक्षात ठेवाल?

पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था या चार अवस्था क्रमवार लक्षात राहण्यासाठी खालील वाक्य पाठ करा.

सूर्य *पूर्वे*ला उगवून *मध्या*वर येतो आणि *पश्चि*मेला *अंत*र्धान पावतो.

इंग्रजीमध्ये हे लक्षात ठेवणे अधिक सुलभ आहे. 

*I,PMAT* म्हणजे "I Pee on MAT"

यात 'I' म्हणजे Interphase, P= Prophase, M= Metaphase, A= Anaphase and T= Telophase.  
================

*प्रश्न-1* गुणसूत्राच्या जोडीला "सिस्टर क्रोमॅटिड" व जन्य पेशीला "डॉटर सेल" असे स्त्रीवाचक नाव का दिले आहे?

*उत्तर*- ज्या पेशीचे विभाजन होते त्याला 'मातृपेशी पेशी' म्हणतात. मात्र पेशींविभाजना नंतर मातृपेशीचे अस्तित्व नाहीसे होऊन त्याचे दोन नवजात जन्य पेशीत रूपांतर होते. त्या जन्य पेशीमध्ये देखील विभाजित होण्याची (प्रजननाची) क्षमता असते म्हणून त्यांना 'कन्या पेशी' असे संबोधतात. मानवी संस्कृतीत स्त्री ही प्रजननाचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे मातृ पेशी, कन्या पेशी, गुणसूत्र भगिनी ही सांकेतिक नावे ठेवण्यात आली असावीत.
■■■

★ *मागील सर्व लेख मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.*
https://shrishail-mathapati.blogspot.com/
💢Ⓜ💢Ⓜ💢Ⓜ

No comments:

Post a Comment