Friday, 15 May 2020

लेखांक-28

लेखांक-2⃣8⃣

💢 *स्वअभ्यास*
इ.10 वी-विज्ञान भाग 2
प्रकरण 2: *सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-1*
=================
*सूत्री विभाजन* Mitosis

■ *अर्थ :*- सूत्री विभाजनात एका जनन (mother) पेशीचे दोन एकसारख्या जन्य  (daughter) पेशीत विभाजन होते. 
लॅटीनमध्ये Mitos म्हणजे धागा; osis म्हणजे कृती/प्रक्रिया. याचा अर्थ DNA धाग्याच्या विभाजनाची प्रक्रिया होय. मराठीत 'सूत्री विभाजन' म्हणजे 'गुणसूत्राच्या विभाजनाची प्रक्रिया' असा अर्थ होतो. 

■ *आढळ:*- सूत्री विभाजन कायिक पेशी आणि मूलपेशी यासारख्या अलिंगी पेशीत घडून येते. 

■ *टप्पे:*- सूत्री विभाजन मुख्यतः दोन टप्प्यात घडून येते.
अ) *प्रकल विभाजन*: संस्कृत भाषेत प्रकल म्हणजे केंद्रक. म्हणून याला केंद्रकाचे विभाजन असे सुद्धा म्हणतात.
ब) *परीकल विभाजन*: परीकल म्हणजे जीवद्रव्य. म्हणून याला जीवद्रव्याचे विभाजन असे सुद्धा म्हणतात. 
-------------------------------------
*अवांतर पण आवश्यक*

■ * पेशी विभाजनाची पूर्वतयारी*

पेशी विभाजन प्रक्रिया कधी सुरु करायची आणि कधी थांबवायची यासाठी पेशीला रासायनिक संकेताद्वारे संदेश मिळतो. संदेश प्राप्त होताच अतिरिक्त ऊर्जा आणि पोषद्रव्यांचा साठा करण्यापासून पूर्वतयारीला प्रारंभ होतो. ही पूर्वतयारी तीन अवस्थामध्ये दर्शवतात.

1) *G1- अवस्था:*- या गॅप 1 अवस्थेत केंद्रकाव्यतिरिक्त इतर सर्व पेशी अंगकांच्या प्रति (Dupicate) तयार केल्या जातात.

2) *S- अवस्था:*- या सिन्थेसिस अवस्थेत DNA च्या प्रति तयार केल्या जातात. 

3) *G2 अवस्था:*- या गॅप 2 अवस्थेत पेशी विभाजनासाठी आवश्यक विकरे तयार केली जातात.

या तीनही अवस्थाना एकत्रितपणे *"इंटरफेज"* असे संबोधतात. यानंतर पेशी प्रकल विभाजनाकडे वळते. 

*टीप*- वरील तीन अवस्थांचा उल्लेख पाठयपुस्तकात नाही. परीक्षेत सुद्धा यावर प्रश्न विचारला जाणार नाही. पेशी विभाजन प्रक्रिया पूर्ण होण्यास साधारण 4 तास लागतात. त्यातील अर्ध्याहून अधिक काळ पेशी पूर्व तयारीत व्यतीत करतो. म्हणून पूर्वतयारीचे महत्व ओळखून ही माहिती तुम्हाला भविष्यात उपयोगी पडेल या उद्देशाने इथे दिली आहे.
------------------------------------
अ) *प्रकल विभाजन*

प्रकल विभाजन खालील चार पायऱ्यांमध्ये पूर्ण होते. 
1) पूर्वावस्था 2) मध्यावस्था 3) पश्चावस्था आणि 4) अंत्यावस्था.

1) *पूर्वावस्था:*-

◆ *वलयीभवन*- या क्रियेत DNA चे धागे गुंडाळले जातात. त्यामुळे ते आखूड व जाड होतात. 

◆ *तारा केंद्र निर्मिती:*- पेशीतील एकमेव ताराकेंद्र द्विगुणीत होते आणि तयार झालेले दोन ताराकेंद्र पेशींच्या विरुद्ध ध्रुवाकडे जातात. 

◆ *केंद्रकावरण अदृश्य होणे:*- हळूहळू केंद्रकावरण व केंद्रकी नाहीसे व्हायला सुरुवात होते.
----------------------------------
2) *मध्यावस्था:*- 

◆ *अर्धगुणसूत्र निर्मिती:*- 
गुणसूत्रांचे घनीभवन पूर्ण होते.  गुंडाळलेले मूळ आणि डुप्लिकेट DNA, गुणसूत्रबिंदू जवळ स्टेपल केले जातात. त्यांना "सिस्टर क्रोमॅटिड" म्हणतात. कारण त्यांच्यातील जनुक एकसारखे असतात. 

◆ *गुणसूत्रांची संरचना:*- 
सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला (मध्यावर) समांतर अवस्थेत रचले जातात. 

*तुर्कतंतू निर्मिती:*- 
दोन्ही तारा केंद्रातून तुर्कतंतू निघून ते गुणसूत्रबिंदूला जोडले जातात.

उर्वरित दोन अवस्था आणि परीकल विभाजन आपण उद्या पाहू. आज स्वाध्याय दिलेला नाही. मात्र वरील माहिती समजपूर्वक पुन्हा पुन्हा वाचा. 
■■■
...✍
*श्रीशैल मठपती,* कोल्हापूर

*मागील सर्व लेख मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.*
https://shrishail-mathapati.blogspot.com/
💢Ⓜ💢Ⓜ💢Ⓜ

No comments:

Post a Comment