लेखांक-2⃣5⃣
💢 *स्वअभ्यास*
इ.10 वी-विज्ञान भाग 2
प्रकरण 2: *सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-1*
★★★★★★★★★
*आजचा स्वाध्याय*:
1) "आपल्या शरीरातील पाण्याचे महत्व स्पष्ट करा.
2) "तंतुमय पदार्थ हे सुद्धा अत्यंत महत्वाचे पोषद्रव्य आहेत." हे विधान स्पष्ट करा.
(संदर्भ: पाठयपुस्तकात पृष्ठ क्र. 17 पहा.)
★★★★★★★★★★
*जाणून घेऊ पेशी*
*श्रीकृष्ण:*- हे पार्थ, पेशी, पर्यायाने सजीव जिवंत राहण्यासाठी पोषद्रव्ये किती महत्वाचे आहेत हे आपण पाहिले. पेशी विषयी तुला आणखी काही शंका असतील तर विचार!
*अर्जुन:*- हे वासुदेव, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे पेशींना जगवण्यासाठी किती मोठी यंत्रणा राबत असते हे समजले. परंतु आपल्या शरीरात पेशींची संख्या असते तरी किती?
*श्रीकृष्ण:*- मानवी शरीरातील पेशींची रचना अत्यंत जटील असते. पेशींची संख्या विचारत असशील तर "अगणित" हेच उत्तर देणे योग्य होईल. तरीसुद्धा ढोबळ मानाने सांगावयाचे झाल्यास सुमारे 100 ट्रीलिअन (खर्व) म्हणजे 100 वर 12 शून्य इतके पेशी असतात.
*अर्जुन:*- म्हणजे मानवी शरीरात आकाशातील ताऱ्यांइतके किंवा त्यापेक्षा जास्तच पेशी असतात तर! मग हे पेशी किती लहान किंवा मोठे असतात?
*श्रीकृष्ण:*- पेशी विविध आकारात आढळतात. रक्ताच्या एका थेंबात सुमारे 40 लाख तांबड्या पेशी असतात. यावरून त्या किती लहान असतील याचा अंदाज बांध. पेशींचे आकार मायक्रोमिटर आणि नॅनोमिटर मध्ये मोजतात. एक नॅनोमिटर म्हणजे एका मिलीमीटरचा 10 लाखावा भाग आहे. तुला ऐकून गंमत वाटेल की, अंडे हे देखील एका पेशी पासूनच बनलेले असते. तसे पाहिले तर शहामृगाचे अंडे सर्वात मोठ्या आकाराचे पेशी आहे.
*अर्जन:*- गंमतच आहे! परंतु हे माधव, पेशी किती दिवस जगतात? का त्यांचे आयुष्य आपल्या एवढेच असते?
*श्रीकृष्ण:*- आपल्या शरीरातील पेशी साधारण 4 दिवस जगतात.
*अर्जुन:* मग मेलेल्या, मृत पेशींचे काय होते?
*श्रीकृष्ण:*- पेशी जीर्ण होतात, जखमी होतात, मृत होतात. त्यांना पेशीत असणाऱ्या "लयकरिका" या पेशी अंगकाकडून पचवले जाते आणि त्यातील आवश्यक द्रव्ये पुन्हा वापरात आणली जातात.
*अर्जुन:*- या लयकरिका जखमी पेशींना सुद्धा पचवतात का?
*श्रीकृष्ण:*- होय. जखमी पेशींच्या जागी पेशी विभाजनाने नवीन पेशी निर्माण केल्या जातात व हळूहळू जखम भरून काढली जाते.
*अर्जुन:*- हे वासुदेव, पेशी विभाजन म्हणजे काय?
*श्रीकृष्ण:*- एका जिवंत पेशीपासून दुसरी पेशी तयार होणे म्हणजे पेशीविभाजन.
*अर्जुन:*- एका पेशीपासून दुसरी पेशी कशी तयार होते हे जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. सविस्तर सांगशील का?
*श्रीकृष्ण:*- हे पार्थ, पेशी विभाजन कसे होते हे सविस्तर सांगायला मला आवडेल! परंतु आज नाही, उद्या!
■■■
...✍
*श्रीशैल मठपती,* कोल्हापूर
💢Ⓜ💢Ⓜ💢Ⓜ
No comments:
Post a Comment